Home Breaking News *काशीपूर येथे श्रीमद्भागवत हरिनाम सप्ताहास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट*

*काशीपूर येथे श्रीमद्भागवत हरिनाम सप्ताहास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट*

191

*काशीपूर येथे श्रीमद्भागवत हरिनाम सप्ताहास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदिच्छा भेट*

*_रामनवमी निमित्त भाविकांनी घेतला धर्मरसाचा आस्वाद_*

 

काशीपूर (ता. चामोर्शी) | 06 एप्रिल 2025, रविवार —

काशीपूर येथे श्री गोविंद स्वामी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या श्रीमद्भागवत हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सदिच्छा भेट दिली. गावकरी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

“धकाधकीच्या जीवनात आपल्या पिढीला योग्य दिशा देणे ही आपली जबाबदारी आहे. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून चांगले संस्कार रुजतात,” असे डॉ. नरोटे यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यक्रमात संत कविताताई दुपारे यांचे प्रेरणादायी भागवत प्रवचन झाले. त्यांच्या भावस्पर्शी वाणीने उपस्थितांना अंतर्मुख केले. डॉ. नरोटे यांनी कविताताईंना मनःपूर्वक आभार मानले व अभिनंदनही केले.

 

काशीबेल येथील पवित्र देवस्थानाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

“आज निवडणुकीनंतर प्रथमच आपल्या गावात आलो. रमेशभाऊ बारसागडे यांनी या परिसराची नेहमीच जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या कडे येणाऱ्या समस्या सोडवण्यात मी सक्रिय राहीन,” असे ठाम वक्तव्यही डॉ. नरोटे यांनी केले.

 

रामनवमी निमित्त त्यांनी सर्वांना भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Don`t copy text!