जिल्हा नियोजन विकास समितीवर दिग्गजांना संधी

300

जिल्हा नियोजन विकास समितीवर दिग्गजांना संधी

गडचिरोली जिल्हा नियोजन विकास समितीवर सदस्य नियुक्तीत शिवसेना,कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष यांचा समावेश

गडचिरोली :- जिल्हा नियोजन विकास समितीवर जिल्ह्यातील दिग्गज लोकांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशा महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना यथोचित सन्मान देत ही निवड करण्यात आली आहे.

विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्यांमध्ये अहेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम तसेच नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार ऍड. अभिजीत वंजारी यांची निवड झाली आहे. तर विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजगोपाल सुलभावार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, कल्पना तिजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सदस्य युनुस शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद सदस्य ऍड. राम मेश्राम, माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांचा समावेश आहे.