Home Breaking News विविध चोरीच्या गुन्ह्रातील आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केली अटक

विविध चोरीच्या गुन्ह्रातील आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केली अटक

98

 

विविध चोरीच्या गुन्ह्रातील आरोपीला गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 

 

11 चोरीचे गुन्हे उघडकीस – एकूण 2,51,700/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

 

 

 

गडचिरोली जिल्ह्रात विविध ठिकाणी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्राविरुद्ध पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत. अलिकडच्या काळात सिरोंचा हद्दीमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या, त्याबाबत विविध गुन्हे पोस्टे सिरोंचा येथे दाखल आहेत. त्याअनूषंगाने प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 09/05/2025 रोजी प्रभारी अधिकारी पोस्टे सिरोंचा पोनि. समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांच्या पोलीस स्टाफ यांनी विविध चोरीच्या गुन्ह्रात सहभागी असलेल्या संशयित आरोपीतांचा शोध घेत असता, मपोउपनि प्राजंली कुलकर्णी या अंमलदारासह पोस्टे हद्दीत रात्रगस्तीवर असताना मिळालेल्या खात्रीशिर गोपनिय माहितीच्या आधारे एक संशयित इसम नामे 1) आकाश नागया कोत्तापेल्ली, वय 20 वर्षे रा. कोत्तापल्ली तह. सिरोंचा जि. गडचिरोली हा मिळून आला. त्यास त्वरित ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याच्या ताब्यात असलेल्या मुद्देमालावरुन त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवा-उडवीची उत्तरे पोलीसांना दिली.

त्यानंतर सदर आरोपीस पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक सखोली चौकशी केली असता, त्याने सिरोंचा पोलीस स्टेशन हद्दीतील व असरअल्ली परिसरातील एकूण 11 चोरीच्या घटना केल्याचे कबूल केले. त्यानूसार चौकशीदरम्यान सांगिलेल्या ठिकाणी त्याच्या सांगण्यावरुन पोलीसांनी छापे टाकले असता, चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिव्हील कामाचे साहित्य, घरगुती वस्तू कपडे, मोबाईल फोन्स इ. मोठ¬ा प्रमाणावर रु. 2,51,700/- रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासावरुन निदर्शनास आल्याने तसेच पोस्टे सिरोंचा येथे दाखल विविध सात चोरीच्या गुन्ह्रांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास काल दिनांक 10/05/2025 रोजीचे पहाटे अटक करण्यात आली व त्याला मा. न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे. यासोबतच आरोपीकडे रिमांड कालावधीमध्ये गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. मारोती नंदे पोस्टे सिरोंचा करीत आहेत.

 

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्य साई कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोस्टे सिरोंचा श्री. समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि. मारोती नंदे, पोउपनि. ज्ञानेश्वर धोत्रे, पोउपनि. नरेंद्र वांगाटे, मपोउपनि. प्रांजली कुलकर्णी, परि.मपोउपनि. लावण्या जक्कन, पोहवा/मनीष गर्गे, पोअं/सुनिल घुगे, राकेश नागुला, मानतेश दागम, सुनील राठोड व संतोष भताने यांनी पार पाडली.

 

।।।।।।।।।।।

Don`t copy text!