Home Breaking News *जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा* – खासदार डॉ. नामदेव कीरसान यांची अधिकाऱ्यांना...

*जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा* – खासदार डॉ. नामदेव कीरसान यांची अधिकाऱ्यांना सूचना

145

*जनतेचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा* – खासदार डॉ. नामदेव कीरसान यांची अधिकाऱ्यांना सूचना

 

*खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुक्याची आढावा बैठक संपन्न*

 

गडचिरोली :: चामोर्शी तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या विविध समस्यांना घेऊन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह चामोर्शी येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,  उपविभागीय अधिकारी चामोर्शी, तहसीलदार, गटविकास अधिकारी  यासह तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिक हे मोठ्या अपेक्षेने आपले छोटे-मोठे काम घेऊन आपल्या पर्यंत फार दुरुन येत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता लवकरात लवकर जनतेचे प्रश्न मार्गी लावा अशा सूचना या बैठकीच्या अनुषंगाने खासदार डॉ. किरसान यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. याचबरोबर घरकुलधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून देणे,थकीत असलेल्या घरकुलधारकांचे हप्त्याचे  वितरण करणे, वन जमिनीच्या पट्ट्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढणे, मान्सून पूर्व जनावरांचे लसीकरण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करणे, अशा अनेक विषयांना घेऊन डॉ. किरसान यांनी विविध विभागाचा आढावा घेतले व आवश्यक त्या सोयी उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने सूचना देखील केल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव ऍड. विश्वजीत कोवासे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेसचे जेष्ठ नेते राजेश ठाकूर, नगरपरिषद उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती  वैभव भिवापुरे, पाणीपुरवठा सभापती सुमेध तुरे, अनिल कोठारे, निकेश गद्देवार, रवींद्र पाल, नीलकंठ निखाडे, मुन्ना गोंगले, बिजन सरदार, रमेश कोडापे सह इतर पदाधिकारी तालुकातील विविध गावातून आलेले नागरिक, शेतकरी, महिला यावेळी उपस्थित होते.

Don`t copy text!