Home Breaking News भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,एक गंभीर

भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,एक गंभीर

151

 

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी चामोर्शी शहरातून जाणाऱ्या आष्टी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर आज (रविवार) एक भीषणभिष अपघात झाला. अचानक यू-टर्न घेतल्याने करला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तिघाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत

 

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत विनोद पुंजाराम

 

काटवे (४१५), राजू सदाशिव नैताम (४५) आणि सुनील वैरागडे (५५), तिघेही गडचिरोली येथील रहिवासी होते. तर अनिल मारोती सातपुते (५०), रा. चामोर्शी हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चौघेही कामानिमित्त कारने आष्टीकडे जात होते चामोर्शी ग्रामीण रुग्णालयासमोर कारचालकाने अचानक यू-टर्न घेतला त्याचवेळी मागून भरधाव वेगात येणाच्या मालवाहू ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला

 

अपघातानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी अनिल सातपुते यांना तात्काळ चामोर्शी ग्रामीण रुणालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविन्यात आले.

 

या घटनेची नोंद चामोर्शी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. घटनेचा अधिक तपास सुरू आहे

 

 

Don`t copy text!