Home Breaking News सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले

67

बामणी (प्रतिनिधी)

 

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना 25 मे रोजी सकाळच्या सिरोंचा तालुक्यातील बामणी वनपरिक्षेत्रांतर्गत टेकडा येथे घडली. श्रीहरी मोंढी आकुदारी (55) असे जखमीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, श्रीहरी आकुदारी हे शेजा-यांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना अचानक अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल पळून गेल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र अस्वलाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी श्रीहरी यांना टेकडाताला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती वनाधिकारी झाडे यांना देण्यात आली. वन परिक्षेत्रधिकारी झाडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक बी. कायते, वनरक्षक गोविंद मोरे यांनी मोका पंचनामा केला. जखमीस शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Don`t copy text!