Home Breaking News दुचाकीच्या अपघातात क्षेत्र सहायक ठार; परीसरात पसरली शोककळा

दुचाकीच्या अपघातात क्षेत्र सहायक ठार; परीसरात पसरली शोककळा

100

दुचाकीच्या अपघातात क्षेत्र सहायक ठार; परीसरात पसरली शोककळा

 

 

आष्टी : वनविभाग कार्यालय घोट येथे कार्यरत असलेले क्षेत्र सहायक भारत निमरड (वय ५५) दुचाकीने आलापल्ली येथील वनविभाग कार्यालयात जात असताना अपघातात ठार झाले.

 

भारत निमरड हे घोट वनविभाग कार्यालयातून आपल्या दुचाकीने आलापल्ली येथील वनविभाग कार्यालयात कर्तव्यावर जात होते. मंगळवार, २७ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना, वेलगुरजवळ त्यांच्या गाडीसमोर अचानक गायींचा कळप आडवा आला. यामुळे त्यांचा भीषण अपघात झाला. यात ते गंभीर जखमी आले.

 

अहेरी पोलिसांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, अहेरी येथे हलवले, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव घोट येथे आणण्यात आले. या घटनेमुळे घोट वनविभाग आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Don`t copy text!