*महिलांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श घ्या*
*आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे प्रतिपादन*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त विदर्भाची काशी मार्कंडादेव येथे जन्म महोत्सव*
*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा – गडचिरोली च्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन*
चामोर्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या वतीने तिर्थ क्षेत्र मार्कंडादेव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात गुरुवारला दि.29 मे आयोजित महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरीत्र, त्यांचे राज्यकारभार, धर्मकार्य या सर्व बाबींवर आपल्या अनोख्या शैलीत प्रकाश टाकला. अहिल्याबाईंनी स्वतःच्या क्षमता ओळखून राज्यकारभार पुढे नेला.
300 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला 2047 मध्ये आपला देश नक्कीच जगातील बलाढ्य देशांनाही मागे टाकेल असा विश्वासही आ. डॉ. देवरावजी होळी यांनी व्यक्त केले.
मार्कडेय मंदिर येथे पुजा अर्चा केली. तसेच जल पूजन करून गंगा आरती केली.
मेळाव्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मातृशक्तीचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी खा. अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आ. डॉ. मिलिंद नरोठे, माजी आ. नामदेव उसेंडी, भाजपा जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे प्रदेश सचिव रेखाताई डोळस, सरपंच संगीताताई मोगरे, वर्षाताई शेडमाके, तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे, पल्लवी बारापात्रे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, आनंद भांडेकर, विलास भांडेकर तालुकाध्यक्ष राकेश सरकार, राजूभाऊ मोगरे, प्रतीक राठी, अंशुल दासरवार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.






