Home Breaking News *_भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्या आईचं दुःखद निधन;मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची...

*_भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्या आईचं दुःखद निधन;मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची भावपूर्ण श्रद्धांजली_*

110

*_भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्या आईचं दुःखद निधन;मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांची भावपूर्ण श्रद्धांजली_*

 

दिं.२९ मे २०२५ (गडचिरोली 🙂

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ तिडके यांच्या आई स्व.पुष्पा तुकाराम तिडके ह्यांचे काल (दि.२८ मे २०२५ )रोजी आकस्मिक दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे तिडके कुटुंबीयांवर आणि समाजावर शोककळा पसरली आहे.

 

अनीलभाऊ तिडके यांच्या आई स्व.पुष्पा तुकाराम तिडके यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी समर्पित जीवन जगले. त्यांच्या जाण्याने एक सुसंस्कारित आणि संघर्षशील व्यक्तिमत्व हरपलं आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि तिडके कुटुंबीयांना या अपार दुःखातून सावरण्याचं बळ मिळो, हीच ईश्वरचरणी मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी प्रार्थना करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

त्यांचा अंत्यसंस्कार विधी गडचिरोली येथील कठाणी नदीच्या घाटावर अत्यंत शोकमग्न वातावरणात पार पडला.

 

या अंत्यविधीस भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते स्वतः उपस्थित राहिले. त्यांनी दिवंगत आत्म्याला मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली आणि तिडके कुटुंबीयांना सांत्वन दिलं.

 

जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांनीही अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहून तिडके कुटुंबीयांप्रती आपली शोकसंवेदना व्यक्त केली.

Don`t copy text!