*मार्कंडा देव तीर्थक्षेत्र येथे महिला मेळावा व जलाभिषेक कार्यक्रम*
*मेळाव्यात बचत गटातील कर्तबगार महिलांचा सत्कार*
*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपचा उपक्रम*
चामोर्शी (मार्कंडा देव) :-
दिनांक :- 30/05/2025
*राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा देव तीर्थक्षेत्र येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.*
*कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने माजी खासदार अशोकजी नेते, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, गडचिरोली चे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, बाबुरावजी कोहळे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, रेखाताई डोळस प्रदेश सचिव, योगिता पिपरे जिल्हा महामंत्री, गिताताई हिंगे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, अनिल पोहनकर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे , डॉ. प्रणयजी खुणे मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष, रोशनी वरघंटे तालुकाध्यक्ष, राकेश सरकार घोट मंडळ अध्यक्ष, संगीता राजू मोगरे सरपंच मार्कंडा, रंजिता कोडापे, पुष्पाताई करकाडे पल्लवी बारापात्रे, कविता उरकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*
*या महिला मेळाव्यात बचत गटातील कर्तबगार महिला उज्वला राजेंद्र भुरसे, मायाताई मडावी, संगीता मोगरे, वनिता भुरसे व अन्य महिलांचा आम.डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ देवरावजी होळी, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.*
*तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर महाजलाभिषेक, दूधाभिषेक, महापूजा व महाआरती अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. यानंतर वैनगंगा नदी घाटावर स्वच्छता उपक्रम राबवून राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या धर्मसेवा, राष्ट्रसेवा आणि लोककल्याणकारी कार्याची आठवण करत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा निर्धार या निमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*






