गडचिरोली येथे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली उत्साहात संपन्न
गडचिरोली,प्रतिनिधी:-
३ जुन या जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला . सायकल चालवा, निरोगी रहा आणि पर्यावरण वाचवा असे आवाहन करत सकाळी ठीक ६ वाजता नियोजनानुसार इंदिरा गांधी चौकापासून रॅली सुरू झाली.
या रॅलीस गडचिरोलीचे प्रथम सायकल दुरुस्ती दुकान, पटेल सायकल डिलर कमलेश पटेल यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला या वेळी जलाराम सायकल डिलर हे उपस्थित होते.
सदर रॅली सुप्रसिद्ध कारगिल चौक,आय.टी.आय चौक, जिल्हा रुग्णालय,टी पाॅईन्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, स्मृती उद्यान,एल.आय.सी.चौक,परत आय.टी.आय चौकापासून गेस्ट हाऊस मार्गे शिस्तबध्द पद्धतीने रॅली काढण्यात आली.दरम्यान सहभागी शेकडो सायकल स्नेहींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.या रॅलीत शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी,शिक्षण विभागातील कर्मचारी वृंद तसेच इतरही ज्येष्ठ सायकल स्नेही सहभागी झाले होते.सकाळी ७ वाजता रॅलीचा समारोप झाला.
यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ सायकल प्रेमी मनोहर निखाडे, आयोजक उदय धकाते सचिव सायकल स्नेही मंडळ गडचिरोली, प्रा.विलास पारखी,कार्याध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे,प्राचार्य सुचिता कामडी,प्रा.सुनिता साळवे, योगिताताई दशमुखे,सौ.मिराताई बिसैन- चौधरी,श्री. केशव दशमुखे,विजयराव साळवे,प्रा.देवानंद कामडी, मुख्याध्यापक मनोज कवठे,प्रा.ज्ञानेश्वर धकाते,प्रा.शेखर गडसुलवार,प्रा.विजय कुतरमारे,प्रा.सोनवने,प्रा.ठाकरे, पुरुषोत्तम ठाकरे,प्रा.आखाडे,प्रा.अनिल शेट्ये,प्रा.अरूण पालारपवार,प्रा.हिवरकर,छबुताई राऊत ,तनुजा राऊत, माधुरी बोरकर आदी सायकल स्नेही हजर होते.समारोप स्थळी सहभागी सायकल स्नेहींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आजच्या सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक केशवराव दशमुखे गुरूजी,जलाराम सायकल डिलर , विजय साळवे तसेच सर्व सायकल सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. सायकल स्नेही मंडळाचे सल्लागार डॉ. शिवनाथ कुंभारे आणि ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सायकल रॅली यशस्वी केल्याबद्दल सदस्यांचे अभिनंदन केले आहे.






