Home Breaking News *गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात यावे* ...

*गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात यावे*               महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांची मागणी

68

*गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात यावे*

महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांची मागणी

 

गडचिरोली दि. ४-६-२०२५

 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांचे दि. ४ जून २०२५ रोजी गडचिरोली नगरीत आगमन झाले त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी इंदिरा चौकात फटाके फोडून व भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी औक्षवाण करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महिला मोर्चाच्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांनी “महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान महाविद्यालय” गडचिरोलीत सुरू करण्यात यावे याबाबत विश्राम गृह येथे ना. नितेश राणे यांना निवेदन दिले. गडचिरोली जिल्ह्यात नद्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे व मत्स्य व्यवसायाला इथे पुरक वातावरण आहे. परंतू मत्स्यव्यवसायासाठी जिल्ह्यात पाणी साठवणुकीची कोणतीही प्रभावी उपाय योजना नाही. मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक मूलभूत प्रशिक्षणाची उपाय योजना नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात आला असून जिल्ह्यातील ३० ते ४० मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. ह्या कारणामुळे तरुण वर्ग या व्यवसायामध्ये रुची दाखवत नाही. गडचिरोलीच्या सुशिक्षित तरुण वर्गाला या व्यवसायात आणण्यासाठी मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची निर्मिती करण्यात यावी व तालुका निहाय प्रशिक्षण केंद्र देण्यात यावे अशी मागणी गीताताई हिंगे यांनी केली. यावर ना. नितेशजी राणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान कॉलेज नागपूरला असल्यामुळे गडचिरोलीत सब सेंटर देण्याचे आश्वासन दिले.यावेळी माजी खासदार अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ बारसागडे,माजी आमदार कृष्णाजी गजबे,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे, जेष्ठ नेते बाबूरावजी कोहळे, शहर अध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ पोहणकर, भाजपाच्या जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, पल्लवी बारापात्रे व भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!