Home Breaking News *राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन...

*राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मानले आभार.*

167

*राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मानले आभार.*

 

*राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब, व आदिवासी विकास मंत्री मा. ना. अशोकजी उईके साहेब यांचे वर्षा निवास मुबई येथे पुष्पगुच्छ देऊन केले आभार व्यक्त.*

 

मुंबई: – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे विभाजन करून

महाराष्ट्रात अनुसूचित जमाती वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आदिवासी विकास’ विभागाच्या अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषंगिक खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्राप्रमाणे राज्यातही आता हा आयोग आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे. ५१ व्या जनजाती सल्लागार परिषदेत महाराष्ट्रात स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार हा आयोग स्थापन करण्यात आला . यात एक अध्यक्ष आणि चार अशासकीय सदस्य राहतील. या आयोगाला संवैधानिक दर्जा मिळावा यासाठी मंत्रिमंडळाने आज दिनाक ३ जून २०२५ रोजी तत्वत: मान्यता दिली. आता शोषित, पीडित आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. समस्या, अडचणी आणि गरजा यावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करणार आहे. यामुळे स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्यातील सर्व आदिवासी समाजासाठी लाभदायक ठरेल. त्यामुळे या निर्णयाचे मी समस्त आदिवासी समाजतर्फे स्वागत करतो. त्यामुळे राज्य सरकारसह मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजीं फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, व मा. आदिवासी मंत्री ना. अशोकजी उईके यांचे मी विशेष अभिनंदन करतो, हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा निवास येथे जाऊन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस. व आदिवासी विकास मंत्री ना. अशोकजी उईके यांची भेट घेऊन पुष्पगुच्छदेऊन आभार व्यक्त केले.

यावेळी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन मुंबई अध्यक्ष गणेश तेली, गोरेगाव शाखा संघटक सुरेश शंकर वारली , निलेश वारली, मतीन भोसले. आदी उपस्थित होते.

Don`t copy text!