Home महाराष्ट्र अन आईसह मुलीचीही जीवनयात्रा संपली …..

अन आईसह मुलीचीही जीवनयात्रा संपली …..

198

अन आईसह मुलीचीही जीवनयात्रा संपली …..

महिलेची मुलीसह विहिरीत उडी? :- उच्चशिक्षित प्रचार्या ने असे कसे केले? परिसरात शोककळा,

वणी : – मारेगाव शहरातील प्रभाग क्रं.१२ (विश्राम गृह परिसर) मध्ये राहत असलेल्या उत्तमराव उलमाले यांची स्नुषा सौ.कोमल उमेश उलमाले (३३)या उच्चशिक्षीत मातेने आपल्या दोन वर्षीय श्रुती या चिमुकलीला घेवुन घराच्या मागील काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेवुन जिवनयात्रा संपविल्याची हृदय हेलावणारी घटना आज दि.२० शनिवारला सकाळी दहा वाजता उघडकीस आली.या हृदयद्रावक घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.तुर्तास आत्महत्येचे नेमके कारण मात्र नि:शब्द झाले आहे.
मारेगाव येथील स्टील भांडे व्यवसायिक उमेश उत्तमराव उलमाले यांचा विवाह सन २०१२ मध्ये वणी येथील मधुकर झाडे यांच्या कोमल नामक मुलीशी झाला होता. उमेश व कोमल यांच्या संसारवेलीवर आठ वर्षाची श्रेया व दोन वर्षाची श्रुती असतांना कोमल ही मारेगाव येथील एंजल कॉनव्हेंट मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत होती.हम दो हमारे दो सह आई वडील असे कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.
मागील चार दिवसापासून उमेश यांची प्रकृती ठीक नसतांना शुक्रवारच्या रात्री सर्वांनी एकत्र बसुन घरी भोजन केले व आपल्या रुम मध्ये उमेश , कोमल व दोन मुली झोपी गेले.उमेश यास रात्री पावणे अकरा च्या दरम्यान जाग आली तेव्हा पत्नी व लहान मुलगी दिसत नसल्याने शोधाशोध घेतली. उशिरा पर्यंत नातेवाईकासह आप्तेष्ठीँना विचारपूस केली मात्र कुठेच थांगपत्ता लागला नाही.सकाळी पोलिसात कळवून मोबाईल लोकेशन घेण्यात आले.मोबाईल लोकेशन मारेगावातील प्रभाग क्रं.६ मध्ये असलेल्या मोबाईल टॉवर जवळ दाखविण्यात आले.मात्र कोमल चा शोध लागला नव्हता.दरम्यान सर्वत्र शोध घेण्याचा वेग वाढला असतांना स्व .चिंधूजी पुरके आश्रम शाळेच्या बाजुला काही अंतरावर असलेल्या विजय थेरे यांच्या शेतातील विहिरीत दुधाची बॉटल व चपला तरंगतांना काहींच्या निदर्शनास आल्याने उपस्थितात धीरगंभीर प्रतिक्रीया उमटू लागल्या.विहिरीत गळ टाकण्यात आल्यानंतर दोन वर्षीय श्रुतीचा मृतदेह व काही वेळात आई कोमल हिचा मृतदेह गळाला लागताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.
उच्चशिक्षीत असलेल्या कोमलने आपल्या चिमुकलीला घेवुन जीवनयात्रा संपविल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट असुन पोलिसांनी घटनास्थळावर विहिरीतील मायलेकीचे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात येवुन उत्तरीय तपासणी साठी मृतदेह ग्रामिण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.परिणामी कोवळ्या मुलीला घेवुन मातेने उचललेले पाऊल बघणार्यांचे मन हेलावून टाकत होते.

Don`t copy text!