रेल्वे अपघातात वृद्धाचा मृत्यू 

116

रेल्वे अपघातात वृद्धाचा मृत्यू 

विसापूर – येथील नागराज चाैक, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये राहणारे एका वृद्धाचा रेल्वे च्या जबर धडकेत मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी १०.४५ वाजता बल्लारपूर – चंद्रपूर डाऊन रेल्वे रूळावर पाेल क्रमांक २४-२५ जवळ चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दत्ता डाेमा सातपुते वय -६७ वर्षे, रा विसापूर ता बल्लारपूर, असे मृतकाचे नाव आहे.
दत्ता सातपुते हे मागील दोन दिवसापासून मानसिक दडपणाखाली हाेते. आज सकाळी १० वाजता दरम्यान काेणालाही न सांगता घराबाहेर पडले. पत्नी मीराबाई हिने पती जेवनासाठी घरी न आल्याने, इतरांना विचारपूस केली. मात्र काेणत्याही मित्राकडे त्याचा शोध लागला नाही. अशातच बल्लारपूर – चंद्रपूर डाउन रेल्वे लाईन वर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाेल क्रमांक २४ -२६ दरम्यान तेलंगणा एक्सप्रेस ने दत्ता सातपुते यांना रेल्वे लाईन जात असताना जबर धडक मारली. यात त्यांचा डावा पाय धडा पासून वेगळा हाेऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी १०.४५ वाजता घडल्याचे आरपीएफ पाेलिस रामवीरसिंह यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पाेलिस जमादार दिपक चालुरकर, माराेती फुलझेले करत आहेत. दत्ता सातपुते यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.