जागतिक जल दिन
दरवर्षी २२ मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच UNO च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे.
पाण्याशी संबंधित प्रश्न नेमके कोणते ?
पाण्याकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल?
पावसाच्या पध्दतीत होणार्या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल?
भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल?
नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल?
तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल?
पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल?
पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल?
पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल?
पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल?
पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल?
आपली भूमिका काय ?
स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे? हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले पाहिजे.
पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे. कुणी करत असेल तर त्याचा प्रतिकार करणे.
लक्षात घ्या, ‘जल है तो, जीवन है’! प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतेच. पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही. पण पाण्याच्या सुयोग्य वापरामुळे आपण पाणी वाचवू शकतो ऊद्याची तहान भागवण्यासाठी.