Home Breaking News  पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त...

 पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

137

पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 

 

* जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने एकूण 03 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

* पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवाद्यांनी देखील नोंदविला रक्तदान शिबिरात उत्स्फुर्त सहभाग

* पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरो ंचा येथे झालेल्या शिबिरात एकूण 330 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

 

सन 2004 पासून 14 जून हा दिवस जगभरात रक्त आणि रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडू आलाम सभागृहामध्ये तसेच उप-मुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरो ंचा येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस उप-अधीक्षक अभियान श्री. विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक, तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नो ंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकूण 330 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगीतले की, गडचिरोली पोलीस दलामार्फत मागील वर्षभरात आयोजित वेगवेगळ्या रक्तदान शिबिरांदरम्यान आतापर्यंत एकूण जवळपास 2800 युनिट रक्ताचे रक्तदान करण्यात आले आहे . ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी किमान तीन महिण्यातून एक वेळा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे. यासोबतच सर्वांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले आहे. तसेच सदरवेळी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवणारे अधिकारी, अंमलदार व आत्मसमर्पित माओवादी सदस्य यांना पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. सदर आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली श्रीमती डॉ. माधुरी किलनाके, पोलीस उप अधीक्षक अभियान श्री. विशाल नागरगोजे, उप विभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी पोलीस रुग्णालय, गडचिरोली श्री. सुनिल मडावी हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उप-पोस्टे/पोमके ंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि धनंजय पाटील, पोउपनि चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेंन्द्र पिवाल, जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. प्रतिक भदाणे व सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपुर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.

 

पोलीस उप-मुख्यालय, प्राणहिता येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये अहेरी, भामरागड, एटापल्ली, हेडरी इ. भागातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. अहेरीच्या रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री. अजय कोकाटे, वैद्यकिय अधिकारी उपजिल्हा सामान्य रुग्णालय, अहेरी डॉ. सचिन धोटे व पोस्टे अहेरी येथील पोनि हर्षल अेकरे आणि इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरो ंचा येथे झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सिरोंचा, जिमलगट्टा, असरअली, पातागुडम इ. भागातील पोलीस अधिकारी/अंमलदारांनी व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक, वैद्यकीय अधीक्षक, सिरोंचा डॉ. चेतना वरठी, वैद्यकीय अधिकारी, अहेरी डॉ. ब्राम्हानंद पु ंग् ाटी, वैद्यकीय अधिकारी, सिरोंच् ा डॉ. करिष्मा नान्ने व डॉ. आदित्य सपकाळ तसेच पोस्टे सिरो ंचा येथील पोनि समाधान चव्हाण हे उपस्थित होते.

Don`t copy text!