Home Breaking News *_वाघाच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबीयांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सांत्वन व...

*_वाघाच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबीयांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सांत्वन व आर्थिक मदत_*

124

*_वाघाच्या हल्ल्यात मृत महिलेच्या कुटुंबीयांना मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सांत्वन व आर्थिक मदत_*

 

*_देलोडा येथे भेट घेऊन प्रशासनाला तत्काळ उपाययोजनांचे निर्देश_*

 

देलोडा (ता. आरमोरी) | १४ जून २०२५

गडचिरोली जिल्ह्यातील देलोडा (ता. आरमोरी) येथील जंगलात मोहटोळ वेचण्यासाठी गेलेल्या मीरा आत्माराम कोवे (वय ५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) या महिलेवर ५ जून रोजी सकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून प्राणघातक हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत मिरा कोवे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे व हळहळ व्यक्त करणारे वातावरण पसरले आहे.

 

ही घटना कळताच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी आज १४ जून रोजी देलोडा येथे भेट देत मृत महिलेच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याकडून कुटुंबीयांना आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.

 

मिरा कोवे या सून व दोन लहान नातींसह राहत होत्या. पती व दोन मुलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्या मोलमजुरी तसेच मोहफुलं व टोळी वेचून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.

 

घटनास्थळी भेट दिल्यानंतर मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. वरुण यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, संबंधित भागात वाघाच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने बंदोबस्त व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

 

या भेटीदरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे सर, सामाजिक नेते डॉ. कवडू बांगरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते खेमराज राऊत, देवराव सयाम, रामदास कोवे, युवा नेते विकास पायडलवार आणि सविता कोवे तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.

Don`t copy text!