*समाजवादी पार्टी महिला सभा देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठीत…*
*हाजरा शेख तालुका अध्यक्ष पदावर तर सुनीता चौधरी उपाध्यक्ष पदी – आणि सचिव पदी सलमा शेख…*
देसाईगंज -:-
. -समाजवादी पार्टी *महिला सभा* देसाईगंज तालुका कार्यकारिणी आज देसाईगंज येथील विश्राम गृह या ठिकाणी गठीत करण्यात आली सदर बैठकीला समाजवादी पार्टी महिला सभा जिल्हा अध्यक्ष सीमा डोंगरे, समाजवादी पार्टी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास खान उपस्थित होते,
बैठकीत देसाईगंज शहरांतील अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आणि महिला सभेची देसाईगंज तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली देसाईगंज तालुका अध्यक्ष पदावर हाजरा शेख, उपाध्यक्ष पदावर सुनीता चिंतामण चौधरी, तर सचिव पदावर सलमा मुजीब शेख यांची नियुक्ती करण्यात आली तसेच तालुका कार्यक्ररिणीत सदस्य म्हणून तारा सिधार्थ रामटेके, गीता दादाजी नैताम, नजमा पठाण, रुबीना शेख, कौशल्या रामटेके, सलमा पठाण, आदीची नियुक्ती करण्यात आली, समाजवादी पार्टी महिला सभेत सदर नियुक्ती ने आनंदाचे वातावरण आहे, समाजवादी पक्षाचे महिलांचे संघटन अजून मजबूत करून समाजवादी पक्षाल जिल्ह्यात मोठे करू असे मत या वेळी महिला सभा जिल्हा अध्यक्षा सीमाताई डोंगरे यांनी व्यक्त केले तर येणार्या काळात नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष् आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार आहे निवडून आंनणार अशी गवाही या वेळी इलियास खान यांनी दिली,