Home Breaking News *जिल्हाधिकाऱ्यांकडून एटापल्ली तालुक्यात यंत्रणेचा आढावा* 

*जिल्हाधिकाऱ्यांकडून एटापल्ली तालुक्यात यंत्रणेचा आढावा* 

117

*जिल्हाधिकाऱ्यांकडून एटापल्ली तालुक्यात यंत्रणेचा आढावा*

* धरती-आबा शिबीराला भेट

* एकलव्य निवासी शाळा बांधकामाची पाहणी

गडचिरोली, दि. 19 जून : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल एटापल्ली तालुक्यात भेट देवून तेथील प्रशासकीय यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, कृषी आणि पावसाळी तयारीसंदर्भात माहिती जाणून घेत त्यांनी आपसी समन्वयाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

उपविभागीय कार्यालय, एटापल्ली येथील सभागृहात आयोजित बैठकीला उपविभागीय अधिकारी नमन गोयल, तहसिलदार हेमंत गांगुर्डे व इतर तालुकास्तरीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वनहक्क कायद्यांतर्गत प्रलंबित दावे तातडीने निकाली काढण्याचे व वनहक्क पट्टाधारकांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्राधाण्याने देण्याचे निर्देश दिले. तसेच कृषी विभागाने गरजू व पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून बोअरवेल योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सांगितले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला ग्रामस्तरावर ब्लिचिंग पावडरचा पुरवठा उपलब्ध करून घेण्याचे तसेच संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे सूचना दिल्या. मोबाईल नेटवर्क, धोकादायक पूल, विद्युत पुरवठा, जलयुक्त शिवार योजनेतील प्रलंबित कामे, पंतप्रधान किसान योजना आणि ॲग्रीस्टॅक योजनेच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यात उघडयावरील धान्यसाठी खराब होवू नये म्हणून तहसीलदार यांनी किमान दोन गोदाम बांधणीसाठी जागा प्रस्तावित करण्याची सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी एटापल्ली येथील एकलव्य मॉडल निवासी विद्यालयाच्या बांधकामाची देखील पाहणी केली.

धरती-आबा योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत 15 ते 30 जूनपर्यंत विशेष संतृप्त शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. एटापल्ली येथील शिबीरात जिल्हाधिकारी पंडा यांनी भेट दिली. यावेळी त्‍यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना विविध लाभ व प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.

0000

Don`t copy text!