*कॉ. मधुकर गोंगले यांची ( CPI ) भाकपाचा जनसंघटन AIDRM अहेरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती*

11

*कॉ. मधुकर गोंगले यांची ( CPI ) भाकपाचा जनसंघटन AIDRM अहेरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती*

 

अहेरी, :

समाजातील वंचित, शोषित आणि दलित घटकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भारतीय कम्युनिष्ट पक्षाचा जनसंघटन असलेल्या अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन समितीच्या अहेरी तालुकाध्यक्षपदी कॉम्रेड मधुकर गोंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ही नियुक्ती **अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार** यांनी केली असून, ग्रामीण स्तरावर दलित समाजाच्या होणाऱ्या अन्याय विरुद्ध व इतर प्रश्नांवर संघर्षशील आणि जागरूक नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

कॉ. मधुकर गोंगले हे सामाजिक चळवळीत सक्रिय असून, त्यांनी मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील संघटन अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा समितीच्या नेतृत्वाने व्यक्त केली आहे.

 

नवीन जबाबदारी स्वीकारताना कॉ. गोंगले यांनी सामाजिक समतेसाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली…