अहेरी येथे CPI च्या जनसंघटनांमध्ये महत्त्वपूर्ण नेमणुका: कॉ. मधुकर गोंगले AIDRM तालुकाध्यक्ष, तर कॉ. सुरेश मोतकुरवार AIKS तालुकाध्यक्षपदी नियुक्त
भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या दोन महत्वाच्या जनसंघटनांत – अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन समिती (AIDRM) आणि ऑल इंडिया किसान सभा (AIKS) – अहेरी तालुक्यात महत्त्वपूर्ण नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
👉 AIDRM अहेरी तालुकाध्यक्षपदी कॉ. मधुकर गोंगले यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती CPI अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कॉ. गोंगले हे अनेक वर्षांपासून सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष करत असून, दलित व मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी ते सातत्याने सक्रिय राहिले आहेत. त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारताना सामाजिक समता, घटनेचे मूल्य आणि हक्कांसाठी लढा चालू ठेवण्याची भूमिका मांडली.
👉 दुसरीकडे, AIKS अहेरी तालुकाध्यक्षपदी कॉ. सुरेश मोतकुरवार यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ऑल इंडिया किसान सभा गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कॉ. सुरेश हे ग्रामीण प्रश्नांवर काम करणारे अनुभवी कार्यकर्ते असून, शेतकरी व श्रमिकांच्या प्रश्नांवर ते मोठ्या बांधिलकीने कार्य करत आले आहेत.
या दोन्ही नियुक्त्यांमुळे अहेरी तालुक्यात भाकपच्या जनसंघटनांना एक नवं नेतृत्व मिळालं असून, स्थानिक प्रश्नांवर अधिक संघटित आणि तीव्र लढा उभारता येईल, असा विश्वास जिल्हा नेतृत्वाने व्यक्त केला आहे…