अपघातग्रस्त नागरिकाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली मदत
अहेरी : तालुक्यातील चिंतलपेठ येथील रहिवासी राजू गावंडे हे चौडमपली वरून गावाकडे येत असताना चौडमपली जवळ मोटर सायकलने अपघात झाला व डोक्याला जबर मार लागुन बसून होते दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे त्याच मार्गाने अहेरीकडे जात असता अपघात स्थळी गर्दी बघून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विचारपूस केले असता १०८ रुग्णवाहिकेला फोन करण्यात आले आहे असे सांगण्यात आले मात्र रुग्णवाहिका यायला वेळ लागले अशी माहिती मिळाली , तेव्हाच आलापल्ली वरून आष्टी कडे एक फिकअप जात असता त्या वाहनाला थांबवून अपघातात जखमी झालेल्या नागरिकाला उपचारांसाठी उप रुग्णालयात आष्टी येथे पाठवण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार समवेत अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, अशोक येलमूले, बबलूभैया हाकिम, शाहीन बाबी हाकिम, दिग्गू कतवार, राकेश सड़मेक, प्रकाश दुर्गे आदि उपस्थित होते.