*भाग्यश्रीताई आत्राम यांच्या ठिय्या आंदोलनाला जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची भेट.*
ढोंगी महायुती सरकारला धारेवर घेत वीर बाबुराव शेडमाके चौक आलापल्ली येथे विविध मागण्यांना घेऊन आजपासून सुरु झालेल्या या विशाल अश्या ठिय्या आंदोलनाला जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषजी ताटीकोंडावार यांनी भेट देऊन विविध विषयांवरती भाग्यश्रीताई आत्राम प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट ) यांच्याशी चर्चा केली. यावेळी शरद पवार गटाच्या विभागीय अध्यक्षा शाहीन भाभी हकीम, कार्याध्यक्ष प्रकाशजी ताकसांडे,नगरसेवक अमोल मुक्कावार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, जहीर भैया हकीम,रहमान शेख,सुमित मोतकूरवार, जितेंद्र टिकले, अभि नागूलवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.