*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल)येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासह शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न*
दिनांक :-२३/०६/२०२५. *चामोर्शी:-* तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाअंतर्गत गावातुन ट्रॅक्टरवर बॅन्ड पथकाच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी द्वारे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 👉याप्रसंगी प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मुरखळा माल ग्रामपंचायतचे सरपंच श्री भास्कर बुरे यांनी केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली मुमडवार यांनी भुषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री लोशन रामटेके,आरोग्यसेविका बोडावार मॅडम,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोरेश्वर तुंबडे,महेश बुरे,विद्या कन्नाके,जयश्री बट्टे,संगिता राऊत,संगिता सोमनकर, गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती हिमदेव पिपरे,शाळेचे मुख्याध्यापक राजू मडावी,पदवीधर शिक्षक गणेश बोईनवार,पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर,विजय राजुरवार,निलकंठ सोमनकर, शाळेचे सहायक शिक्षक अशोक जुवारे,चंद्रकांत वेटे, जगदिश कळाम,राजकुमार कुळसंगे, अंगणवाडी सेविका पुष्पा बुरे,सरिता बुरांडे,उषा गेडाम,दिकोंडावार ताई,पुष्पा मोहुरले,नयना मोहुरले,सरिता सरपे आदी मान्यवर उपस्थित होते. 👉याप्रसंगी *एक पेड माॅ के नाम* या उपक्रमाअंतर्गत कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच भास्कर बुरे,अध्यक्ष रुपाली मुमडवार व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. 👉उद्घाटनप्रसंगी सरपंच भास्कर बुरे यांनी शाळा हे ज्ञान व संस्कारांचे उत्तम मंदिर असुन विद्यार्थ्यांनी शाळेत दररोज उपस्थित राहावे आणि शाळेतुन शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा व संस्कारांचे उपयोग स्वतःच्या व समाजाच्या कल्याणासाठी व विकासासाठी करावे.असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना केले. 👉 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार कुळसंगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजू मडावी यांनी केले.आणि पाहुण्यांचे आभार जगदिश कळाम यांनी मानले. 👉 कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मिष्ठान्न भोजन देऊन करण्यात आली.