*शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवावा :- सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन*

2

*शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन शिक्षणाचा दर्जा वाढवावा :- सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन*

 

*माजी मंत्री आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात चिंचगुंडी येथे शाळा प्रवेशोत्सव तनुश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न*

 

आज दिनांक 23 जून रोजी विदर्भात सत्र 2025- 26 ची शाळेची घंटा वाजली व नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली.. अहेरी तालुक्यातील चिंचगुंडी येथे सुद्धा मोठ्या थाटात विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव उपक्रम घेण्यात आला. माजी मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटिका होत्या. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभा पानेम शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचगुंडी, तर प्रमुख अतिथी म्हणून कमला बापू आत्राम सरपंच, सुशीला कसूरवार उपसरपंच, राजेंद्र टिचकुले साहेब गटशिक्षणाधिकारी, विनोद पुसालवार केंद्रप्रमुख, श्री रापत्तीवार, शंकर पाने राज बापू आत्राम चिन्ह पानेम शंकर पाने अंगणवाडी सेविका, भुरसे सर शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व कर्मचारी, आणि गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करावा असे आव्हान यावेळेस सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मरावबाबा यांनी केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी शाळेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व चिमुकल्यांशी संवाद साधला.