ब्रेकिंग बातमी
आलापल्ली येथे सिरोंचा पुलिया जवळ आढळले नक्षल बॅनर..!
अहेरी:- आलापल्ली गावालगतच असलेल्या सिरोंचा पुलिया जवळ लाल रंगाचे नक्षल ब्यानर आज सकाळी लागून दिसून आल्याने एकच खळबळ माजून गेली आहे..
सविस्तर असे की आलापल्ली ला लागूनच असलेल्या आलापल्ली सिरोंचा मुख्य मार्गावर सिरोंचा पुलिया च्य बाजूला अवघ्या 50 मीटर अंतरावर लाल रंगाचे एक ब्यानर लागले असून यात सी 60 ला चेतावणी देत खोटे शोध अभियान राबवून आदिवासी चे जंगल, शेत आणि घरे जाळने बंद करा असे लिहले असून…… पुढे जे लिहले आहे त्याचा आणि पोलीस विभागाचा काही संबंध नाही तर राजकीय व्यक्तीला संबोधून लिहले असे वाटते पुढे लिहले आहे की स्वतः ची खोटी प्रशंसा करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेक बंद करा अन्यथा परिणाम भोगण्यास तैयार रहा भा क पा असे लिहले आहे
सदर ब्यानर हे दोन साग वृक्ष चा आधार घेऊन बांधन्यात आले असून ब्यानर च्या खाली दोन छोटया रिकाम्या बाटली बांधून असून त्यात पांढऱ्या रंगाचे काही तरी पदार्थ भरले असून त्यात इलेक्ट्रिक वायर चे दोन टोक सोडले असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, सहा पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस उप निरीक्षक सुधीर पडुळे, जनार्दन मडावी, मंगू आत्राम आदी उपस्थित होते वरिष्ठ अधिकारी यांना घटनेची माहिती देताच त्यानी सावध आणि सुरक्षित पवित्रा घेत आधी बाँम्ब पथक बोलवून नंतर च ब्यानर ला हात लावण्याचा निर्णय घेतला..