*_धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा! जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०४ कोटींचा बोनस थेट खात्यावर — मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या दूरदृष्टीचे ठोस पावले शेतकऱ्यांना दिलासा.. मा.खा.डॉ. अशोकजी नेते_*
गडचिरोली | दि. ६ जुलै २०२५
राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधाराचा मोठा दिलासा मिळाला आहे. ४८,००० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल १०४ कोटी रुपयांचा बोनस थेट जमा करण्यात आला असून, यामुळे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण १२० कोटी रुपयांचा बोनस निधी मंजूर केला आहे. यातील १०४ कोटींचे वाटप यशस्वीपणे पूर्ण झाले असून, उर्वरित रक्कम लवकरच थेट खात्यांमध्ये जमा होणार आहे. शासनाने हेक्टरी २०,००० रुपये दराने, अधिकतम २ हेक्टरपर्यंत बोनस देण्याचे नियोजन केले आहे.
*_शासनाच्या निर्णयावर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रतिक्रिया :_*
“धानाचा बोनस देऊन शासनाने शेतकऱ्यांना दिला आधार… केंद्र व राज्य शासन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे!”
— डॉ. अशोकजी नेते, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा, राष्ट्रीय महामंत्री
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले,
“राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यामुळेच आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. अनेक विरोधक या बोनसवर शंका व्यक्त करत होते, पण हे सरकार ‘बोले तैसा चाले’ या उक्तीचे खरे पालन करणारे आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजपा युतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा कृतीतून सिद्ध केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.”
शासनाच्या निर्णयाचे ठळक मुद्दे: ₹१२० कोटी बोनस निधी मंजूर — गडचिरोली जिल्ह्यासाठी _ पहिल्या टप्प्यात ४८,००० शेतकऱ्यांना ₹१०४ कोटींचा थेट लाभ _ हेक्टरी ₹२०,००० पर्यंत बोनस — जास्तीत जास्त २ हेक्टरसाठी_
उर्वरित रक्कम लवकरच जमा होणार — दुसरा टप्पा सुरू होणार
*शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधान!*
या बोनस वितरणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक भांडवली मदत मिळाल्याने उत्पादनक्षमता वाढेलच, शिवाय शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही बळावणार आहे.
“शेतकऱ्यांचे जीवन सन्मानाने घडवणारे आणि त्यांना सक्षम बनवणारे निर्णय हेच सरकारचे खरे कार्य आणि कर्तव्य आहे…” असे वक्तव्य मा.खा.— डॉ. अशोकजी नेते यांनी केले.