रक्तदान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजसेवी संस्था स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन
गडचिरोली :-
दिनांक – 05/07/2025 रोज शनिवारला सायंकाळी ठीक 5.00 वाजता श्री.रंजन बल्लमवार, छत्रपती शाहूनगर, गडचिरोली यांचे घरी श्री शंकरराव कस्तुरवार यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.
रुग्णांना रक्ताची निकड लक्षात घेता रक्तदान हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक समाजसेवी संस्था स्थापन करण्यासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली.
श्री.रंजन बल्लमवार यांनी प्रस्ताविकातून रक्तदानाचे महत्त्व तसेच भविष्यात रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा हे आजच्या सभेला पटवून दिले. त्याकरिता रक्तदान हा उद्देश ठेवून, आपण सर्वांनी एक समाजसेवी संस्था स्थापन करू या, असा बैठकीत प्रस्ताव ठेवला. त्यास उपस्थितांनी होकार दर्शविला व संस्था स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले. सदर संस्थेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय समाजसेवी संस्था,गडचिरोली असे नाव देण्यात आले. सभेला प्रविण चन्नावार,नितिन संगिड़वार,कमलाकर वड़ेटीवार, गांगरेड्डीवार सर व मित्रपरिवार उपस्थित होते. संस्थेत एकूण 11 सदस्यांची कार्यकारिणी करण्याचे ठरले.
त्यानुसार खालील प्रमाणे कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
1)श्री.रंजन बल्लमवार – अध्यक्ष
2)श्री.सुधीर नकटुजी चौधरी – उपाध्यक्ष
3)श्री. अविदास सावसाकडे – सचिव
4)सौ. शुभांगी सुरमवार – कोषाध्यक्ष
5) श्री सुधीर योगाजी चौधरी – सदस्य
6) श्री अतिफ खान – सदस्य
7) श्री दिनेश खारकर – सदस्य
8) श्री रविंद्र आयतुलवार – सदस्य
9) श्री स्नेहल संतोषवार – सदस्य
10) श्री निकेश निकुरे – सदस्य
11) सौ. सिमा बल्लमवार – महिला प्रतिनिधी
अशा प्रकारे सर्वानुमते कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. श्री रंजन बल्लमवार यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभेची सांगता करण्यात आली.






