*गडचिरोली जिल्ह्याचा विश्व हिंदू परिषद अभ्यास वर्ग संपन्न*
विश्व हिंदू परिषद गडचिरोली जिल्ह्याच्या तीन दिवसीय अभ्यास वर्ग स्वप्न महल आरमोरी येथे संपन्न झाला. अभ्यास वर्गाच्या उद्घाटनाला प्राचार्य अद्दलवार महात्मा गांधी विद्यालय आरमोरी, प्रांत सह गोरक्षा प्रमुख मनोज हंबर्डे, विभाग मंत्री परागजी दवंडे, धर्मप्रसार जिल्हाप्रमुख पुंडलिक नेवारे महाराज, प्रतिष्ठित व्यापारी चंदू भाऊ वडपल्लीवार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे होते. जिल्हा मंत्री शंकर बोरकर जिल्हा सहमंत्री नानाजी खुणे , जिल्हा सहमंत्री रमेश बोदलकर प्रखंड मंत्री अनूप असाटी, बजरंग दल जिल्हा संयोजक अमन गहेरवार, आरमोरी प्रखंड मंत्री राजूभाऊ जराते, आयुष न्यालेवार यांनी अभ्यास वर्गाचे नियोजन केले . समारोपिय कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती माजी नगर अध्यक्ष पवन नारनवरे व पतंजली योगपीठ जिल्हाध्यक्ष सत्यनारायण चक्कीनारपुवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील हिंगे हे होते. संपूर्ण प्रखंडातील प्रखंड कार्यकारिणीचे सदस्य कार्यकर्ता या अभ्यास वर्गाला उपस्थित होते, हिंदू धर्मावरील आव्हाने, हिंदू धर्माची सद्य परिस्थिती व विविध आयामाच्या विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली, संवाद सत्रामध्ये विभागीय मंत्री पराग दवंडे यांनी विश्व हिंदू परिषद कार्यपद्धती कार्यकर्त्यांना सांगितली, बौद्धिक वर्गामध्ये प्रांत सह गोरक्ष प्रमुख मनोज जी हंबर्डे यांनी विश्व हिंदू परिषद ध्येय व उद्देश ह्या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विमर्श या विषयावर परागजी दवंडे यांनी मार्गदर्शन केले गटशहा झालेल्या चर्चेमध्ये पंच परिवर्तन या विषयावर जिल्हा मंत्री शंकर बोरकर यांनी मार्गदर्शन केले व चर्चासत्र संपन्न केले तीन दिवसाच्या अभ्यास वर्गात प्रातःस्मरण व सत्संगाशिवाय बजरंग दल उपासना केंद्र व दुर्गा वाहिनीच्या शक्ति साधना केंद्रात व्यायाम योग सूर्यनमस्कार प्रशिक्षण शिवाय मैदानी खेळ घेण्यात आले, जिल्हा अभ्यास वर्गात नवीन पदाधिकारी दायित्वाची घोषणा करण्यात आली त्यामध्ये सौ योगिता दशमुखे मातृशक्ती जिल्हा संयोजिका, सौ विद्याताई जवळे मातृ शक्ती जिल्हा सहसंयोजिका, सौ सुधाताई नाकाडे जिल्हा सत्संग प्रमुख मातृशक्ती, डॉ.नेताजी बनसोड प्रखंड अध्यक्ष वडसा, सौ सोमवती लंजे मातृशक्ती संयोजिका वडसा, सुशीला ताई ठलाल मातृशक्ती सहसंयोजिका वडसा, कु. प्रगती जावरे दुर्गा वाहिनी संयोजिका वडसा, ओमप्रकाश बुध्दे मूल्य शिक्षण प्रमुख वडसा,देणेश्वरी भांडेकर दुर्गा वाहिनी संयोजिका आरमोरी, ईश्वरजी बनसोड प्रखंड सत्संग प्रमुख कुरखेडा, हिमांशू डोकमारे प्रखंड सहसंयोजक कुरखेडा, नैनीता दरवडे दुर्गा वाहिनी संयोजिका कुरखेडा, कु.श्रावणी हर्षे दुर्गा वहिनी संयोजिका प्रखंड गडचिरोली, तृप्ती चकिनारपूवार मातृशक्ती संयोजिका प्रखंड आरमोरी, वरील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा






