Home Breaking News *माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कॅन्सरग्रस्त महिलेला औषध उपचारासाठी आर्थिक मदत…!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कॅन्सरग्रस्त महिलेला औषध उपचारासाठी आर्थिक मदत…!*

162

*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा कडून कॅन्सरग्रस्त महिलेला औषध उपचारासाठी आर्थिक मदत…!*

 

अहेरी : तालुक्यातील बोटलाचेरू येथील रहिवाशी वनिता सदाशिव मडावी ही महिला कॉन्सरग्रस्त असून दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी वनिता मडावीला अडचण भासत होती.आज श्रीकांत सदाशिव मडावी आणि सीताराम वारलू मेश्राम काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची अवस्था सांगितले होते.

 

अजय कंकडालवार वनिता मडावी यांचा अडचण बघून त्यांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत केले आहे.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे उपस्थित श्रीकांत सदाशिव मडावी व सीताराम मेश्राम यांना सांगितले.औषध उपचारासाठी आर्थिक मदत मिळल्याने वनिता मडावी यांचा चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले आणि कंकडालवारांचे आभार मानले.

 

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,श्रीकांत मडावी,सीताराम मेश्राम,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.

Don`t copy text!