*एटापल्ली येथे मानव विकास मिशन अंतर्गंत सावित्रिच्या लेकींना सायकलचे वाटप .*
ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्या-येण्यासाठी प्रवास सोयीचा होऊन त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी राजमाता राजकुंवरबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्लीच्या वर्ग 8 ते 12 वीच्या मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत सावित्रीच्या लेकींना प्राचार्य श्री प्रभु डोंगरवार व प्राचार्य श्री . राजु झोडे मदरलँड इंग्लीस मिडीयम स्कूल एटापल्ली हस्ते 24 सायकलचे वितरण करण्यात आले .
सायकलमूळे शाळेत दररोज येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, वेळेची बचत होईल व अंखडित शिक्षण चालू राहणार असलाचे मत मुलींना यावेळी व्यक्त केले . ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारून शाळा सोडणाऱ्याचे प्रमाण कमी होईल तसेच मुलींचा व्यायाम होऊन आरोग्य सुधारण्यासाठी सायकलचा उपयोग होणार असल्याने मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते . सायकल वितरणावेळी प्रा . तानाजी धोंगडे, प्रा . किशोर दरवडे , सौ . वंदना उपगन्लावार ,श्री . जनार्धन कोठारे, श्री . नागेश झिंका, कु . शांताबाई सोमनकर, श्री . संघपाल बोरकर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .






