Home Breaking News आमदार मोहन मते यांच्या हस्ते इटकेलवार हेल्थ क्लिनिक चे शुभारंभ तसेच निःशुल्क...

आमदार मोहन मते यांच्या हस्ते इटकेलवार हेल्थ क्लिनिक चे शुभारंभ तसेच निःशुल्क रोग निदान व आरोग्य शिबिर सपंन्न

97

आमदार मोहन मते यांच्या हस्ते इटकेलवार हेल्थ क्लिनिक चे शुभारंभ तसेच निःशुल्क रोग निदान व आरोग्य शिबिर सपंन्न

नागपुर:-

 

“जन सेवा हीच ईश्वर सेवा” ही म्हण यंदा इटकेलवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. जयंत व्ही. इटकेलवार (एम. एस. जन सर्जरी), त्यांचे सुपूत्र डॉ. भूषण ज. इटकेलवार (एम. डी. मेडिसिन) व सून डॉ. माधवी भू. इटकेलवार (एम. एस. प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ) यांनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्याने, “निःशुल्क रोग निदान व आरोग्य मार्गदर्शन शिबिर” रेशीमबाग गार्डन येथे ६ जुलै २०२५ ला आयोजित करून सिद्ध केले.

 

या शिबिराद्वारे, एकूण १९७ लाभार्थ्यांनी, निःशुल्क हिमोग्लोबिन, ब्लड शुगर, HbA1c, थायरॉइड, ब्लड प्रेशर तपासणी चा लाभ व फिजिशियन आणि स्त्रीरोग तज्ञ चा सल्ला घेतला.

 

या शुभप्रसंगी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने, दक्षिण नागपूर चे माननीय आमदार श्री . मोहनजी मते यांच्या हस्ते “इटकेलवार हेल्थ क्लिनिक” चे शुभारंभ देखील करण्यात आले. हे क्लिनिक डॉ. जयंत व्ही. इटकेलवार यांच्या राहत्या घरी “विठाई” N84, रेशीमबाग येथे स्थित असून, तेथे डॉ. भूषण ज. इटकेलवार सकाळी ९-११ व डॉ. सौ. माधवी भू. इटकेलवार सायंकाळी ६-८ कार्यरत राहणार आहेत.

 

मान. आमदार श्री. मोहन मते यांनी शिबिरास भेट देऊन, जनसंपर्क साधला व उपस्थितांच्या आरोग्य संधर्भात माहिती घेतली. त्यांनी नियमित आरोग्य तपासणी संदर्भात मार्गदर्शन केले व इटकेलवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच डॉ. जयंत, डॉ. भूषण व डॉ. माधवी इटकेलवार यांना हे “जन सेवा कार्य” स्वरूपी शिबिर या मगलप्रसंगी आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

 

तसेच या शिबिरास मान. श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार, अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ, माजी आमदार. श्री. अशोकजी मानकर, डॉ .अनंतजी दासरवार माजी डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस, श्री संदीप इटकेलवार विश्वस्थ नागपूर सुधार प्रन्यास , डॉ अनिरुद्ध वाघ प्रेसिडेंट लॉयन्स क्लब नागपूर मेडीकोज.,डॉ. अरविंद हरणे, उपाध्यक्ष वैद्यकीय सेवा समिती,श्री अमर आकरे अध्यक्ष कलासंगम नागपूर ,डॉ.संजयआंबटकर जेष्ठ चिकित्सक,श्री प्रदीप इटकेलवार ,श्री रवींद्र इटकेलवार, उपाध्यक्ष नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस,श्री रोहन इटकेलवार डायरेक्टर इटकेलवार आर्किटेक्ट, शिमती. पद्म देठे अध्यक्ष रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी व मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांचं सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

 

या शिबिरास कलासंगम नागपूर व तसेच कलासंगम च्या इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष सहयोग देऊन सहकार्य केले. तसेच सन्माननीय लायन्स क्लब ऑफ नागपूर मेडीकोज व रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी च्या सदस्यांनी देखील शिबिरास सहयोग दिले.

Don`t copy text!