आज एका मृत्यूसह 39 नवीन कोरोना बाधित तर 20 कोरोनामुक्त
गडचिरोली,(जिमाका)दि.24:आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 20 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10272 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9804 वर पोहचली. तसेच सद्या 360 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एक मृत्युमध्ये 62 वर्षीय महिला इतर जिल्ह्यातील होती. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.44 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.49 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्के झाला.
नवीन 39 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 16 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 10, आरमोरीर तालुक्यातील 8, चामोर्शी तालुक्यातील 2, कुरखेडा तालुक्यातील 1, मुलचेरा तालुक्यातील 1, वडसा तालुक्यातील 1,जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 20 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 19, चामोर्शी तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील कारमेल शाळा 1, नवेगाव 2 ,रेड्डी गोडावून 1, बालाजी नगर 1,कन्नमवार वार्ड 1,कारमेल शाळाचे मागे 1,स्थानिक 1, विसापूर 1,विश्राम भवन 1,आशिर्वाद नगर 2,आंनद नगर 1,पंचायत समिती 2, रामनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये नागेपल्ली 3, स्थानिक 2, आलापल्ली 2, फारेस्ट कॉलनी 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये तहसिल कार्यालय जवळ 1, ताडुलवार नगर 3, इंदिरा नगर 1, स्थानिक 1, जिल्हा परिषद शाळा पिसे वाडा 1, भगतसिंग चौक 1, चामोर्शी तालुक्यातील कोनसरी 2, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, मूलचेरा तालुक्यातील रविंद्रनाथ टागोर शाळे जवळ 1, वडसा तालुक्यातील हनुमान वार्ड 1, यांचा समावेश आहे.