Home Breaking News *माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून तरुणांचे रोजगाराचे स्वप्न झाले...

*माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून तरुणांचे रोजगाराचे स्वप्न झाले पूर्ण

156

*माजी कॅबिनेट मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून तरुणांचे रोजगाराचे स्वप्न झाले पूर्ण*

 

*पिपलीबुर्गी व हालेवारा येथे सिनेट सदस्या,एलटी गोंडवाना कंपनीचे डायरेक्टर तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते युवकांना नियुक्ती पत्र वाटप*

 

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा, व येथील जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा हे स्वप्न आहे. याचीच एक स्वप्नपूर्ती म्हणून एलटी गोंडवाना या कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. आज दिनांक 8 जुलै रोजी हालेवारा व पिपली बुर्गी येथे प्रशिक्षित युवक युवतींना तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम व पीएसआय नागेश शेट्टीवार यांच्या हस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर स्थानिक युवक युवतींचे स्वप्नपूर्ती झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी धर्मरावबाबा आत्राम व एलटी गोंडवाना कंपनीचे आभार मानले. नियुक्तीपत्र वाटप करताना कंपनीचे वरिष्ठ पदाधिकारी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा जिल्हाध्यक्षा व गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व एलटी गोंडवाना कंपनीचे डायरेक्टर तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम, हालेवारा व पिपली बुर्गी चे प्रभारी अधिकारी व गावातील जेष्ठ कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Don`t copy text!