चंद्रपुर गानली समाज कमेटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सपंन्न
चंद्रपूर : वृत्तवाणी न्यूज
चैतन्य जेष्ठ नागरीक भवन चंद्रपुर ईथे वर्ग 10 वी व वर्ग 12 वीच्या गुणवंत विद्यार्थांचे गुणगौरव सत्कार सोहळा समाज बांधवांचे ऊपस्थीत जिल्ह्यातील गुनंवंत विद्यार्थांचे सत्कार सोहळा संपन्न झाला,एका समाज बांधवाने 10 वीत टाॅपर व 12 वीत टाॅपर असलेल्या विद्यार्थां प्रती 2000, 2000 हजार रु. देऊन त्यांचा गुन गौरव सत्कार कमेटीच्या अध्यक्षांचे द्वारे करण्यात आले.
संबंधीत कार्यक्रमाला प्रमुख अतीथी श्री अशोक संगीडवार, चंद्रपुर. श्री चंद्रशेखर चन्ने जी. गुंजेवाही, व श्री भास्कर कुंदावारजी दिघोरी हे लाभले. व मंचावर कमेटीचे अध्यक्ष
श्री किशोर पोटवारजी व सचीव श्री प्रफूल वडेट्टीवार, कोषाध्यक्ष श्री दिलीप पुण्यपवार हे मंचावर होते. व संचालन श्री चंद्रकांत कोतपल्लवार यांनी अगदी सुंदर केले असुन,
मंचावरील मान्यवरांनी अती सुंदर मार्गदर्शन केले. व सर्वच विद्यार्थांना चंद्रपुर गानली समाज कमेटी कडून टाॅपी देऊन सत्कार करण्यात आले. व श्री श्रीकांत मद्दावार या समाज बांधवाने सर्वच विद्यार्थांना टाॅपी देऊन त्यांचे सत्कार केले. आणी समाजात पहीला CA रोहीत अनिलराव गांगरेड्डीवार यांचा कार्यक्रमात अती उत्साहाने सत्कार करण्यात आले. व आभार प्रदर्शन सौ. सिमा गोडशेलवार यांनी केले. इथून सभा समाप्त करण्यात आली.





