काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांनीच काँग्रेस खासदारांचा आदेश झुगारला? – शौचालय प्रश्नावरून “टाळा खोलो” आंदोलनाची चेतावनी!
**एटापल्ली (जि. गडचिरोली) | प्रतिनिधी**
एटापल्ली नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असून, नगराध्यक्षही काँग्रेसच्या आहेत. मात्र तरीही **स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांच्या स्पष्ट आदेशालाही काँग्रेस नगरसेवक व नगराध्यक्षांनी दुय्यम स्थान दिले** असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
**दोन वर्षांपासून बंद असलेले बसस्थानकावरील सार्वजनिक शौचालय** अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय महिला फेडरेशनने *”टाळा खोलो आंदोलन”* उभारण्याचा इशारा दिला आहे.
### **खासदारांचा आदेश – सर्वांच्या समोर, तरीही दुर्लक्षित!**
महत्वाचे म्हणजे, **एका वर्षापूर्वी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान काँग्रेसचे खासदार स्वतः उपस्थित होते**. या बैठकीत **सर्व काँग्रेस नगरसेवक स्टेजवर व काही खाली बसलेले होते**. त्या बैठकीत **खासदारांनी थेट मुख्याधिकारी यांना शौचालय १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते**, आणि हे सगळं **जनतेसमोर खुलेआम** घडलं.
### **त्यांच्याच पक्षाच्या आदेशालाही किंमत नाही?**
हे दृश्य डोळ्यांनी पाहिल्यानंतर देखील वर्षभरात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे **काँग्रेस नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रशासनावर प्रभावही टाकू शकत नाहीत की त्यांना जनतेच्या गरजांशी काही देणेघेणेच नाही,** असा सवाल उपस्थित होतो.
### **महिला फेडरेशनचा रोष वाढतोय**
कॉ. गीता दासरवार (उपाध्यक्ष, अखिल भारतीय महिला फेडरेशन) व कॉ.अश्विनी गुज्जलवार-कंगाली तालुका संयोजक यांनी निवेदनात म्हटले आहे की, *“महिलांना खुले मैदान गाठण्याची वेळ येत आहे, आणि सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. ही केवळ उदासीनता नसून अपमान आहे.”* आणि स्वच्छ भारत मिशन चा मज्जाक उडाला आहे
—
### **फेडरेशनच्या प्रमुख मागण्या:**
1. शौचालय अद्याप सुरू का झाले नाही, याचे लेखी स्पष्टीकरण.
2. सुरु करण्यासंबंधी सुरु असलेली कार्यवाही सविस्तर सांगावी.
—
### **शासनाला अल्टिमेटम:**
जर लवकरात लवकर शौचालय सुरू झाले नाही, तर **बस स्थानक परिसरात आंदोलन छेडले जाईल आणि टाळा तोडून जनतेकडून वापर सुरू करण्यात येईल.**