*_धानोरा तालुक्यासाठी ८० कोटींच्या दोन पूल प्रकल्प आणि रुग्णवाहिका सेवेसाठी निधीची मागणी — मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री मान. नितीनजी गडकरी यांना निवेदन…._*

66

*_धानोरा तालुक्यासाठी ८० कोटींच्या दोन पूल प्रकल्प आणि रुग्णवाहिका सेवेसाठी निधीची मागणी — मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री मान. नितीनजी गडकरी यांना निवेदन…._*

गडचिरोली | १४ जुलै २०२५

धानोरा तालुका हा अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि मागास म्हणून ओळखला जातो. येथील मूलभूत पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या असून नागरिकांना दररोज अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर धानोरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण पुलांचे बांधकाम आणि तातडीच्या आरोग्य सेवेकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना प्रत्यक्ष भेट देत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

 

प्रस्तावित विकासकामे व अंदाजे खर्च खालीलप्रमाणे –

1. धानोरा – चिचोली कठाणी नदीवरील पुलाचे बांधकाम- अंदाजे खर्च : ₹४० कोटी

2. दूधमाडा – मिजगाव खुर्द दरम्यान कठाणी नदीवरील पुलाचे बांधकाम-अंदाजे खर्च : ₹४० कोटी

 

3. धानोरा शहरासाठी तातडीची ‘ॲम्बुलन्स सेवा’ उपलब्ध करून देणे

गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे ही सेवा अत्यावश्यक आहे.

 

या सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत, मा. गडकरी यांनी Central Road Fund (CRF) अंतर्गत निधी मंजुरीसाठी तात्काळ डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. यामुळे पुलांच्या कामाला गती मिळणार असून आरोग्य सेवा सुधारणार आहे.

धानोरा सारख्या भागात अशा विकासकामांची गती येत प्रगती होईल व जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल. स्थानिकांनी सातत्यपूर्ण केलेल्या ह्या मागणीत जनतेच्या हितासाठी एक दिशा मिळेल आणि विकासाच्या मार्गावर धानोरा तालुका सुद्धा प्रगतीपथावर राहील असा आशावाद मा.खा.डॉ. नेते यांनी व्यक्त केला.

 

या महत्वपूर्ण निवेदन प्रसंगी प्रामुख्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ साळवे, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,सामाजिक नेते धनंजय पडीशाल्लवार, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे आयटी सेल प्रमुख अक्षय उईके, युवा नेते सारंग साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.