Home Breaking News *चामोर्शी, आष्टी , घोट परीसरात खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा* 

*चामोर्शी, आष्टी , घोट परीसरात खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा* 

76

*चामोर्शी, आष्टी , घोट परीसरात खतांचा मोठया प्रमाणात तुटवडा*

 

*खतांचा पुरवठा त्वरित करा – भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी*

 

*सध्या रोवणीचा हंगाम सुरु झाला. शेतकऱ्यांना खतांची गरज असताना ऐन हंगामात चामोर्शी, आष्टी, घोट परीसरात खतांचा तुटवडा पडला असून शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी हे चामोर्शी आष्टी घोट परिसरात जनसंपर्क दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेवुन खतांच्या तूटवड्याबाबतची समस्या जाणुन घेतली. व या परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दरात तातडीने गरजेच्या प्रमाणात खतपुरवठा करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले*.

 

 

*खतांचा तूटवडा होत असल्याने कृषी केंद्र विक्रेते जादा दराने खतांची विक्री करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. धान व कापसाच्या पिकाला फवारणीसाठी खताची आवश्यकता आहे अशावेळी खत खरेदीला गेल्यानंतर खतांचा तुटवडा असल्याचे विक्रेते सांगत आहे त्यामुळे अव्वाच्या सव्वा भाव देवून शेतकऱ्यांना खते खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कृषी अधिकाऱ्यांनी यांची त्वरित दखल घेवून चामोर्शी, आष्टी, घोट परिसरात खतांचा योग्य पुरवठा करावा व खतांचा कृत्रिम तूटवडा होत असल्यास व जादा दराने खत विक्री ची चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश डॉ देवराव होळी यांनी दिले. सुभाषग्राम येथील शेतकऱ्यांनी या संदर्भात डॉ. होळी यांना निवेदनही दिले.यावेळी सतीश रॉय, निरंजन बाच्छाड, विकास मैत्र, रेभा सरदार, सुमांकार मंडल, संतोष रॉय, विश्वजीत बार, क्रिष्णपद साना, हरी सरकार, आदित्य बिश्वास, निमय बाला, दिलीप सरकार, ईश्वर बिश्वास आदी शेतकरी उपस्थित होते*.

 

*डॉ.देवराव होळी यांनी जनसंपर्क दौऱ्यात शेतकऱ्यांच्या दारी जाऊन समस्या ऐकून घेत असल्याबद्दल शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार मानले*

Don`t copy text!