नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद
▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ▪️
अहेरी – वेलगुर ते टोल रस्त्याचे भूमीपूजन तर इंदिरा नगर वेलगुर येतील माता मंदिराचे उदघाटन संपन्न.
वेलगुर परिसरात कल्लेम रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे,वेलगुर -गोमनी रस्ता,शंकरपूर रस्ता व अनेक समस्याचे निराकरण करण्याची नागरिकांची मागणी केले होते व शंकरपूर येते माता मंदिर,वेलगुर येतील इंदिरा नगर मध्ये माता मंदिर ची मागणी केले सदर कामे प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मला मनापासून आनंद असल्याची भावना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्यक्त केली.
इंदिरानगर येतील माता मंदिर उदघाटन समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हणाले,आलापली-वेलगुर क्षेत्रातून मी जेव्हा पाहिलंदा जि.प.साठी उभे झालो असता नागरिकांनी सदर रस्त्याची व पुलाच्या,माता मंदिर बोरवेल असे अनेक कामाची मागणी माझ्याकडे केली होती. मी नागरिकांना या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असुन जास्तीत जास्त कामे करू असे शब्द दिला होता. सदर शब्द मी पूर्ण करत जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे विकास निधीतुन मंजूर करू शकलो याचा मनापासून आनंद असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,वेलगूरचे सरपंच श्री.किशोर आत्राम,उपसरपंच श्री.उमेश मौहूर्ले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर माजी सरपंच लालू करपेत,माजी उपसरपंच श्री.अशोक येलमूले,ग्रा.प.सदस्य,वामनराव मडावी, श्री.कन्न्नाके,आदि होते.
यावेळी गावातील महिला पुरुष बहूसंख्येनी उपस्थित होते.