Home Breaking News नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे माननीय गांगुर्डे साहेब तहसीलदार...

नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे माननीय गांगुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली तालुका यांची भेट 

164

नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे माननीय गांगुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली तालुका यांची भेट

 

 

आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी एटापल्ली तालुक्यातील नेताजी सुभाष चंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे माननीय गांगुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली तालुका यांनी भेट देऊन वस्तीगृहातील सर्व सोई सुविधांची ,विद्यार्थी आरोग्य विषयी , शालेय गुणवत्तेची तपासणी केली.

यावेळी मा. गांगुर्डे साहेबांनी पावसाळ्यात होणाऱ्या रोगां विषयी माहिती दिल्ली. विद्यार्थाच्या आरोग्या विषयी वस्तीगृहात कोणत्या उपाय योजना केल्या जातात या विषयावर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बेडके सर यांच्याशी विचारपूस करण्यात आली. तसेच प्रत्येक मुलांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्या विषयी माहिती घेतली. साथींच्या रोगाची लागण होऊ नये यासाठी वस्तीगृहात स्वच्छता अगदी चोख पणे पाळली जाते, तसेच पावसाचे पाणी वस्तीगृहातील परिसरात जमा राहत नाही, डासांची पैदास होत नाही, वेळोवेळी डासांना मारण्यासाठी फवारणी करण्यात येते हे बघून मा. गांगुर्डे सर समाधानी झाले.

आरोग्या बरोबर विद्यार्थी गुणवत्ता व साक्षरता यांची पाहणी करतांना मा. गांगुर्डेसर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बेडके सर यांच्या सोबत वस्तीगृहातील प्रत्येक खोलीत जाऊन स्वच्छता व विद्यार्थी गुणवत्ता तपासणी केली.

रवीवारची शासकीय सुट्टी असून देखील मा. गांगुर्डे सर गट्टा सारख्या अतिदुर्गम भागात येऊन विद्यार्थी आरोग्य व गुणवत्ता पाहणी करतात ही लक्षणीय बाब आहे. या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. बेडके सर , शाळेचे शिक्षक , वस्तीगृहाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!