*जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे ?* *जिल्ह्यातील रोजगार हिरावून घेणाऱ्यांची आता गय करणार नाही? प्रत्येक गावातील युवकांनी आता एकत्रित होण्याची गरज!….*
*- डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (म प्र )*
गडचिरोली दिनांक 1 ऑगस्ट 2025
गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श गाव व ग्रामसभेच्या माध्यमातून जल जंगल जमीनला सर्वाधिकार मिळवलेले देशातील सर्वप्रथम गाव लेखा मेंढा येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे व उपाध्यक्ष डॉ, भारत खटी यांनी सदिच्छा भेट दिली व ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना जिल्ह्यातच काम मिळायला पाहिजे व जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रत्येक गावात कार्य करणार असे संकल्प करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभियांत्रिकी व विविध पदवी घेतलेले तथा विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिक्षण संपादन केलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार आज बाहेर जिल्हा अथवा राज्याबाहेर जाऊन काम करत आहेत परंतु जिल्ह्यत त्यांना आजपर्यंत रोजगार मिळालेला नाही? व गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांना जिल्ह्यतच रोजगार मिळालाच पाहिजे याकरिता ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांच्यासोबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाचे वतीने त्यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या बेरोजगारी परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आले व गडचिरोली जिल्ह्यात गावागावातील सुशिक्षित बेरोजगारांनी एकत्रित येण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ, प्रणय भाऊ खुणे यांनी केले यावेळी ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी सुद्धा या कार्यात सक्रिय सहभाग देऊन कार्य करण्याचा आश्वासन दिले व गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगाराला त्याच्या गावातच व गडचिरोली जिल्ह्यातच रोजगार मिळाला पाहिजे याकरिता पुढील कार्य करण्याचे प्रतिपादन केले, यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे सामाजिक कार्यकर्ते साई भाऊ बोम्मावार, गौतम अधिकारी, सुकलाल सरकार,दिनेश भाऊ खुणे प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा ताई मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये, बाळकृष्ण माडूरवार तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,






