Home Breaking News केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसनसूर येथे उत्साहात...

केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसनसूर येथे उत्साहात संपन्न

96

केंद्र स्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसनसूर येथे उत्साहात संपन्न.

वृत्त्वानी न्यूज

दि. 1 ऑगस्ट 2025

आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय श्री राकेश कोकुलवार साहेब शाळा व्यवस्थापन समिती हे लाभले. प्रमुख पाहुण्यांचे स्थान सन्माननीय श्री राकेश बोलमपल्लीवार साहेब तसेच सन्माननीय श्री शिरीष येरावार सर व सन्माननीय श्री संतोष कावरे सर हे लाभले. सुरुवातीला राष्ट्रगीत, प्रतिज्ञा,संविधान आणि उत्तम असा सुविचार “आई बाबाला विसरू नये “तसेच महाराष्ट्र गीत व “हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे ” audio speaker च्या माध्यमातून ऐकल्यावर तर एक नवीनआल्हाददाई व प्रसन्न असे वातावरण अनुभवयाला मिळाले.

प्रास्ताविक केंद्रप्रमुख सर सन्माननीय श्री शिरीष येरावार यांनी केले. सूत्रसंचालनाची धुरा सन्माननीय शिक्षक श्री संघर्ष गजबे यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केली. विद्येची माता सरस्वती, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांना वंदन करून तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी व लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन निमित्त त्यांना अभिवादन देखील करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय श्री संतोष कावरे सर यांनी शिक्षण परिषदेविषयी थोडक्यात माहिती सांगितली.

आयडलं टीचर.

श्री शिरीष येरावार सर यांनी आयडल टीचर या विषयावर आपली माहिती सादर केली. त्यात त्यांनी प्रामुख्याने दोन आयडल शिक्षक,माझी सुंदर शाळा, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी प्रगत असणे आवश्यक आहे, अध्ययन निष्पत्ती वाचन,लेखन, श्रवण,बीएमआय इंडेक्स, स्वयंप्रेरणा याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले.

विषय:निपुण महाराष्ट्र

सन्माननीय श्री संजय भोयर सर पुंनूर यांनी निपुण महाराष्ट्र या विषयावर अतिशय चांगली माहिती दिली.यात दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना एक ते नऊशे नव्यानव पर्यंत संख्या वाचन त्याचप्रमाणे निपुण भारतचा gr हा आपल्या जवळ असणे किती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अध्यापनात निपुण भारत व अभ्यासक्रम दोन्ही एकत्रित रित्या राबवण्याची सीईओ साहेबांची संकल्पना देखील त्यांनी या ठिकाणी विशद केली

विषय: विद्यांजली पोर्टल

याविषयी सन्माननीय श्रीकृष्ण उरकुडे सर कमके या उपक्रमशील आमच्या सहकाऱ्यांनी या पोर्टल द्वारे नोंदणी कशाप्रकारे करायची. ज्या वस्तू शाळेला पाहिजे त्यांची मागणी कशाप्रकारे करायची याविषयी माहिती सादर केली.

अल्प उपहारामध्ये मोड आलेली मटकी तसेच मिठाई यांचा आस्वाद घेण्यात आला 😋त्यानंतर पुनःश्च एकदा सन्माननीय धडाडीचे केंद्र प्रमुख श्री शिरीष येरावार सर यांनी एक पेड माँ के नाम,अमृत वृक्ष,१०० कोटी वृक्ष लागवड, इको क्लब,pat पेपर कसे घ्यावे, पालक समिती कशी गठित करावी,सखी सावित्री, शाळा इमारत निर्लेखन,15 ऑगस्ट ला कवायत कंपल्सरी आहे याची माहिती दिली.त्याचप्रमाणे स्कॉलरशिप,घरघर संविधान, संविधान उपक्रम,विज्ञान मेळावा, शासकीय कर्मचारी आचारसं हिता,मलेरिया विषयी जागृती, 15 ऑगस्ट चे पत्र याविषयी संपूर्ण माहिती उपस्थित शिक्षक बांधवाना दिली.

PAT चाचणी

सन्माननीय मॅडम श्री भारती मुंजुमकर चोखेवाडा टोला यांनी अतिशय उत्कृष्ट्य रित्या याविषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये NEP2020 त्यानंतर ही चाचणी कोणत्या वर्गासाठी होते.त्यामध्ये असणारे विषय लेखी आणि तोंडी परीक्षेला किती गुण द्यायचे.त्यानंतर विद्या समीक्षा केंद्र चार्ट यूएसके चार्ट बोर्ड पॅट चे पेपर व्यवस्थित कसे ठेवावे याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली.

परख राष्ट्रीय सर्वेक्षण

सन्माननीय श्री राहुल राजकोंडावार सर चोखेवाडा टोला यांनी परख सर्वेक्षण निकाल याविषयी सविस्तर माहिती दिली.

विनोबा ऍप

अगदी शेवटच्या तासाला सन्माननीय श्री चंदन रापत्तीवार सर यांच्या आगमन झाले आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या युडायस कसा भरावा, स्कॉलरशिप फॉर्म कसा भरावा, याविषयी माहिती दिली. पेपर मध्ये लिहिताना चुका नाही झाल्या पाहिजे, स्कॉलरशिपचा अभ्यास कसा शिकवावा, POM अर्थात post of the month या विषयी माहिती दिली. आनंददाई शनिवार,ब्लॉक लेवल अँड डिस्ट्रिक्ट लेव्हल,फोटो कसे अपलोड करावे,व्हिडिओ कसे अपलोड करावे,.चावडी वाचनमध्ये कथा, कविता वाचन, स्पेलिंग बी,, pm मॉडेल स्कूल, KGUP, स्पोकन इंग्लिश हे 6घटक वर मार्गदर्शन केले.. टी एल एम अर्थातच टीचिंग लर्निंग मटेरियल याविषयी त्याच प्रमाणे परसबाग आणि सुनहरा शनिवार कसा साजरा करावा याविषयी त्यांनी अतिशय मोलाची मार्गदर्शन उपस्थिताना केले.

संमेलन पार पडण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कसनसूर येथील सर्व शिक्षक अतुल पालपलीवार, श्री संदीप गावंडे तसेच विद्यार्थी यांनी मेहनत घेतली

आभार प्रदर्शन: सर्वात शेवटी आभार प्रदर्शन सन्माननीय श्री मुकेश शंकरराव धोंगडे यांनी केले. शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Don`t copy text!