*भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या जिल्हामहामंत्री पदावर गीताताई हिंगे यांची नियुक्ती*
भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांची भाजपा च्या जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.
गेली अनेक वर्षापासून त्या आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा आहेत. मुळातच त्यांच्यात नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य असल्यामुळे इथेही महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर त्यांनी महिलांची संघटन बांधणी सुरू केली व काही दिवसातच पक्षात मोठ्या प्रमाणात महिलांचे संघटन उभे केले. जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याझाल्याच महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर लोकसभेची निवडणूक व लगेच विधानसभा निवडणूकीची जबाबदारी आली. त्या सामाजिक क्षेत्रातून आल्या असल्यामुळे राजकारणातला फारसा अनुभव नसताना सुद्धा न डगमगता दोन्ही निवडणुकीच्या जबाबदाऱ्या सर्वांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडल्या. त्यांच्या नेतृत्वात अनेक उच्चविद्याविभूषित महिलांनी पक्षात प्रवेश घेतला. महिला पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रदेशावरून आलेले कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभर प्राबविले आणि कौतुकास पात्र ठरल्या. त्यांच्या कार्याची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना पदोन्नती देऊन भाजपाच्या जिल्हा महामंत्री पदी त्यांची नियुक्ती केली.
या नियुक्तीचे श्रेय त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ,भाजपा प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे , विदर्भ प्रदेश संघटन मंत्री आदरणीय उपेंद्रजी कोठेकर, महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आदरणीय चित्राताई वाघ ,माजी खासदार डॉ. अशोकजी नेते , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशजी बारसागडे , गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ.मिलिंदजी नरोटे, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार,माजी आमदार डॉ. देवराव होळी , माजी आमदार डॉ. कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी , माजी जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांना दिले आहे.






