Home Breaking News *_भाजपा कामगार मोर्चा गडचिरोली तर्फे मंदिर परिसर सफाई, तुळशी पूजन व रक्षाबंधन...

*_भाजपा कामगार मोर्चा गडचिरोली तर्फे मंदिर परिसर सफाई, तुळशी पूजन व रक्षाबंधन अभियान संपन्न_*

60

*_भाजपा कामगार मोर्चा गडचिरोली तर्फे मंदिर परिसर सफाई, तुळशी पूजन व रक्षाबंधन अभियान संपन्न_*

*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचा दिला संदेश_*

 

दि. ०९ ऑगस्ट २०२५, गडचिरोली :-भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, जिल्हा गडचिरोली तर्फे व प्रदेश कामगार मोर्चाच्या आदेशानुसार, आज दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथील हनुमान मंदिर परिसरात मंदिर परिसर सफाई, तुळशी पूजन व रक्षाबंधन अभियान उत्साहात पार पडले.

 

या अभियानात मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः हजेरी लावून हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छता करत समाजातील स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी तुळशी पूजन विधी आणि बहिणींकडून रक्षाबंधनाचा पारंपरिक विधीही पार पाडण्यात येत आहे.

 

जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर यांनी माहिती देताना सांगितले की, हा अभियान ९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. सर्व मंडळ व तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी या निमित्ताने स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, अध्यात्मिक जपणूक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

 

या प्रसंगी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव गोवर्धनजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, दिवाकर नक्षीने, तसेच भाजपा कामगार मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय पांडे महाराज धर्मप्रचारक, रमेश मुरमुरवार, मेघनाथ बावणे, प्रशांत अल्लमपटलावार, सुनिल मुरस्कर, अनिल देवोजवार, मुखरू कावडे, दशरथ सोनटक्के, दयाराम खोबरे, प्रकाश मारबते आदी मान्यवरही उपस्थित होते.

Don`t copy text!