व्हीनस सुझुकी गडचिरोली – 2024-25 मध्ये उत्कृष्ट सेवा आणि परफॉर्मन्ससाठी गौरव!
गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित टू-व्हीलर डीलरशिप व्हीनस सुझुकी यांनी 2024-25 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राहक सेवा, गुणवत्ता नियंत्रण आणि विक्रीपश्चात सेवेतील कामगिरीसाठी सुझुकी मोटरसायकल इंडिया कडून विशेष पुरस्कार पटकावला आहे.
मुंबई येथे आयोजित भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हीनस सुझुकीचे संचालक श्री. विश्राम संभाजी होकम स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, व्यवसायातली दूरदृष्टी आणि गडचिरोलीच्या ग्रामीण भागातून उत्तम सेवा देण्याची जिद्द सर्व उपस्थितांनी अनुभवली.त्यांनी सांगितले की, “गडचिरोलीसारख्या छोट्या जिल्ह्याला एवढा मोठा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळणं ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही आमच्या सर्व टीमच्या एकत्रित मेहनतीचे फलित आहे.”
श्री. होकम यांनी नेहमीच “ग्राहक हा आमचा खरा ब्रँड अँबेसिडर” या तत्त्वावर भर देत डीलरशिपमध्ये दर्जेदार सेवा, वेळेवर डिलिव्हरी, प्रशिक्षित स्टाफ आणि सतत नविन उपक्रम राबवत ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे.
या सन्मानामुळे गडचिरोली जिल्ह्यातूनही उच्च प्रतीची सेवा देणे शक्य आहे हे सिद्ध झाले असून, व्हीनस सुझुकी ही नावाजलेली व विश्वासार्ह डीलरशिप ठरली आहे.
ग्राहक सेवा, वेळेवर कामगिरी, दर्जेदार सर्व्हिस व ग्राहकांचे समाधान यावर भर देत व्हीनस सुझुकीने संपूर्ण वेस्ट झोनमधील डिलर्सना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला.
हा पुरस्कार वेस्ट झोन मधील सहा राज्य- महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड – व या मधे असणारे 178 अधीकृत डीलर्स मधुन नामांकन झालेले आहे.
श्री. विश्राम होकम सर, सर्व्हिस मॅनेजर-श्री विहार साखरे, श्री भुषण झरले,टेक्निशियन, अॅडव्हायझर आणि बॅकएंड टीम – सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!






