*भाजपा मुलचेरा तालुका मंडलची विस्तारित कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न..*
*_मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे संघटन बळकट करण्यावर निर्धार – जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.._*
दि. १० ऑगस्ट २०२५, मुलचेरा – भारतीय जनता पार्टी, तालुका मुलचेरा अंतर्गत मुलचेरा मंडलची विस्तारित कार्यकारिणी बैठक आज रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, चंद्रपूर द्वारा संचलित स्वामी विवेकानंद छात्रावास, तालुका मुलचेरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा. डॉ. अशोकजी नेते उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांतजी कुतरमारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशजी दत्ता, बंगाली आघाडीचे प्रदेश सदस्य दिपक हलदार, भाजपा मुलचेरा तालुकाध्यक्ष संजयजी सरकार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा सचिव सुभाष गणपती, जिल्हा सदस्य बादल शहा, विदान वैद्य, तालुका महामंत्री निखिल हलदार, मारोती पेंदाम, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा अमिता सरकार, सुनिता मडावी, पौर्णिमा मडावी यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी बैठकित मार्गदर्शन करतांना म्हणाले “भाजपा मुलचेरा तालुक्याची विस्तारित कार्यकारिणी बैठक ही येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास झपाट्याने सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तळागाळात जाऊन कार्य करणे गरजेचे आहे. माझ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली असून, आगामी काळातही विकासाची गती कायम ठेवण्याचा प्रयत्न राहील.”
तसेच त्यांनी गडचिरोली जिल्हा आघाडीच्या नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यासोबतच बैठकीत जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांतजी कुतरमारे आणि लाडक्या बहिणींचा देवा भाऊ या रक्षाबंधनाच्या विषयावर सविस्तर माहिती महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या सोबतच जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.
या बैठकित संघटन मोहिमेच्या नियोजनासंदर्भात सविस्तर नियोजन व चर्चा करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्पनेतून रक्षाबंधन निमित्ताने महिला मोर्चाच्या नेतृत्वात प्रभावी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकर्त्यांच्या सूचना व मागण्यांचा आढावा एकूणच, ही बैठक संघटनात्मक दृढतेसह आगामी राजकीय वाटचालीसाठी प्रेरणादायी दिशा ठरवणारी ठरली.






