मित्राच्या प्रेमाखातर घराबाहेर पडला तो कधीही परत न येण्यासाठी

1458

मित्राच्या प्रेमाखातर घराबाहेर पडला तो कधीही परत न येण्यासाठी

रंगपंचमीच्या दिवशी कोतपल्लीवार कटुंबीयावर दुःखाचे सावट

बल्लारपूर :- रंगपंचमी च्या दिवशी बल्लारपूर शहरातील कोतपल्लीवार कुटुंबा सोबत घडला आज होळी व धुलीवंदनाच्या नीमित्ताने रंग खेळून घरी परतलेला व आराम करीत असतांना मित्राचा फोन आला व मित्राच्या प्रेमाखातर तो घराबाहेर पडला तो कधीही परत न येण्यासाठीच सूत्राच्या माहितीनुसार ऋषिकेश संजय कोतपल्लीवार हा रंग खेडून घरी परतला व आराम करू लागला तोच एका मित्राच्या फोन आला की मित्र व सवंगडी वर्धा नदीवर अंघोळ करण्याचा बेत आखला व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या पाणी टंकी असलेल्या घाटावर दुपारी 2 : 00 वाजताच्या अंघोळी करिता वर्धा नदीत उतरला तोच त्याचा तोल जाऊन वर्धा नदीत बुडू लागताच मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ऋषिकेश संजय कोतपल्लीवार नदीत बुडाला या घटनेचे वृत्त मित्राने मृतकाच्या वडिलांना सांगताच वडिलांनी क्षणाचीही वेळ न दवळता याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी घटनेची गँभीर दखल घेत त्वरित घटनास्थळ गातगले व सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास ऋषिकेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उत्तरीय तपासणी करीता दाखल केले व पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.