महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली तर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना होळी निमीत्त वस्त्र, पुरणपोळी व फळ वाटप.

169

महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली तर्फे वृद्धाश्रमातील वृद्धांना होळी निमीत्त वस्त्र, पुरणपोळी व फळ वाटप.

गडचिरोली:- महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली चे वतीने दरवर्षी पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात येते आणि व‌द्धाश्रमातील वृद्धांना टावेल, पुरणपोळी व फळ वाटप करण्यात आले . यावेळी महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार तथा गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष डॉ शिवनाथ कुंभारे, मा पंडित पुडके, मातोश्री वृद्धाश्रम संस्थेचे अध्यक्ष श्री देवाजी सोनटक्के, महा अंनिस चे जिल्हा अध्यक्ष श्री उद्धव डांगे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विलास निंबोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, जिल्हा प्रशिक्षण विभाग प्रमुख तथा सर्प मीत्र प्रा श्री विलास पारखी, सुधाकर दुधबावरे वार्तापत्र विभाग प्रमुख, शहर अध्यक्ष श्री गोविंदराव ब्राम्हणवाडे, उपाध्यक्ष श्री दामोधर ऊप्परवार, लहुजी रामटेके शहर उपाध्यक्ष, वर्षा पडघम विधी सेवा विभाग, श्री प्रविण रामगीरवार, प्रीयंका निंबोरकर, कु रूतूजा ऊप्परवार, कु स्वानंदी पुडके , सौ वर्षा राजगडे, भुरकाबाई रोहनकर आदी उपस्थित होते. यावेळी महा अंनिसचे जेष्ठ सल्लागार मा. पंडित पुडके यांना डॉ कुंभारे साहेब व इतर सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भुरकाबाई रोहनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बरीच मेहनत घेतली तर सोनटक्के सर यांनी होळी निमीत्त पुरणपोळी वाटप सारखे उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून वृद्धाश्रमाच्या वतीने आभार व्यक्त केले.