आधारविश्व फाऊंडेशन तर्फे होळी निमित्य सेमाना देवस्थान येथे कचऱ्याची होळी

260

आधारविश्व फाऊंडेशन तर्फे होळी निमित्य सेमाना देवस्थान येथे कचऱ्याची होळी
गडचिरोली:- बहरलेल्या वृक्षाच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे नुकसान करून होळी साजरी करण्यापेक्षा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून होळी साजरी करावी, याच विचाराची कास धरून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी होळी निमित्त आधार विश्व फाऊंडेशन तर्फे गडचिरोली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर(सेमाना) चा परिसर स्वच्छ करून कचऱ्याची होळी करण्यात आली.28-3-2021रोज रविवारी पहाटे 5-30 वाजता आधारविश्व फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांनी हातात खराटे घेऊन सेमाना देवस्थान परिसर स्वच्छ करण्यास सुरवात केली.सफाई करतांना जिथे भाविक स्वयंपाक करतात त्या ठिकाणी सर्वत्र जेवून फेकलेले प्लास्टिक ताट, वाट्या, ग्लासेस यांचा सडा पडलेला होता. एवढेच नाही तर लहान मुलांचे डायफर सुद्धा तिथे फेकलेले होते.तसेच काही हौसे गौसे नवसे मंडळी अशा धार्मिक स्थळी दारूच्या पार्ट्या करून दारूच्या बाटल्या तिथेच फेकून दिलेल्या होत्या.आधारविश्व च्या सर्व सदस्यांनी प्लास्टिक चा कचरा वेगळा करून पोत्यात भरला आणी बाकी कचऱ्याची होळी केली.या उपक्रमातुन हाच संदेश द्यायचा आहे की वृक्षाच्या मोठमोठ्या फांदया तोडून होळी करण्यापेक्षा सर्वांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याची होळ करावी. जेणेकरून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी गडचिरोलीतील सर्व भाविकांना कळकळीची विनंती केली की स्वयंपाक जरूर करा पण प्लास्टिक चा कचरा तिथेच टाकून न देता कचरा कुंडीत टाका.जेणेकरून परिसर स्वच्छ राहील व प्रदूषण होणार नाही.तसेच दारूच्या पार्ट्या अशा धार्मिक स्थळी करून विटंबना करू नका. इतर बरेच ठिकाण आहेत अश्या पार्ट्या करण्यासाठी.या उपक्रमात आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, सदस्या विजया मने, कांचन चौधरी, जयश्री चांदेकर, मीरा कोलते, सुनीता आलेवार, ऐश्वर्या लाकडे,प्रीती मेश्राम, आरती खोब्रागडे तसेच विकास अधिकारी सुशील हिंगे,तनिष्का चांदेकर, संपदा भोयर, शर्मिष्ठा चौधरी सहभागी झाले होते